विविध सुविधा मिळणार : किंमत 6 लाखावर
नवी दिल्ली
मारुती कंपनीची नवी बलेनो सादर करण्यात आली असून याचे बुकिंगही सुरु झाले आहे. ग्राहकांना सदरची गाडी सहा रंगांमध्ये खरेदीचा पर्याय असणार असून यात एअरबॅगची सुविधा मिळणार आहे. प्रारंभीची किमत ही 6.35 लाख रुपयांपासून सुरु होणार असल्याचे समजते. 9.49 लाख (एक्स शोरुम) किंमत गाडीची राहणार आहे. नवीन मॉडेलमध्ये 360 व्यू कॅमेरा दिला आहे. या फिचर्ससोबत आपल्या सेगमेंटची पहिली हॅचबॅक बनली आहे. यामध्ये 22.35 केपीएल मायलेज मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. नवीन बलेनोचा प्रंट ग्रिल जुन्या मॉडेलच्या तुलनेत जादा चौरस आहे.