वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार कंपनी म्हणून मारुती सुझुकीला ओळखले जाते. या कंपनीच्या वाहनांची विक्री डिसेंबर महिन्यात 3.9 टक्क्यांनी वाढून 1 लाख 33 हजार 296 झाली आहे. डिसेंबर 2018 रोजी हा आकडा 1 लाख 28 हजार 338 इतका राहिला होता. देशातील बाजारात मात्र ही विक्री वाढून 1 लाख 25 हजार 735 युनिटवर स्थिरावली होती. निर्यातीचा आकडा 10.2 टक्क्यांनी वधारुन 7,561 राहिला असल्याची माहिती कंपनीने बुधवारी दिली आहे.
मॉडेल डिसें. 2018 डिसें.2019 बदल
मिनी आल्टो, एस-प्रेसो, ओल्ड वॅग्नार 27,649 23,883 -13.6
कॉम्पॅक्ट न्यू वॅग्नार, स्विफ्ट, सेलेरियो,
इग्निस, बलेनो, डिझायनर 51,346 65,673 27.9
एकूणः मिनी कॉम्पैक्ट 78,995 89,556 13.4
मिड साईज सिआज 4,734 1,786 -62.3
एकूणः प्रवासी कार 83,729 91,342 9.1
यूटिलिटी वाहन : 20,225 23,808 17.7
व्हॅन ओमनी, इको 15,850 7,634 -51.8
हालकी व्यावसायिक-सुपर कॅरी वाहने 1,675 1,591 -5.0