वर्षाकाठी 10 लाखांपेक्षा अधिकच्या कार्सचे उत्पादन
नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार निर्मितीमधील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी इंडिया भारतामध्ये सर्वात मोठा ऑटोमोबाईल प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास 18,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये मारुती हरियाणा येथे नवीन कारखाना उभारण्याचे संकेत आहेत. वर्षाला 10 लाखापेक्षा अधिक कार्सची निर्मिती सदरच्या नव्या कारखान्यातून करण्याचे उद्दिष्ट असल्याचे समजते.
गुरुग्राममधील आपला कारखाना अन्यत्र हलवण्याची योजना कंपनीच्या डोक्यात आधीपासून होती. सदरचा हा कारखाना 300 एकरच्या जागेत आहे.