कंपनी विक्रीतील नुकसान कमी करण्यासाठी करणार प्रयत्न
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मारुती सुझुकीच्या नवीन सेलेरियोचे बुकिंग सुरु झाले आहे. सदरची गाडी बाजारात येणार असल्याची ग्राहक वाट पाहात होते. अखेर सदरच्या गाडीचे बुकिंग सुरू झाले आहे. मारुती सेलेरियो 2021 आपल्या नवीन सुविधांसह भारतीय रस्त्यांवर उतरणार आहे.
इच्छुक ग्राहक यासाठी 11,000 रुपयामध्ये बुकिंग करु शकणार असून कारमध्ये बाहेरील डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. केबिनला आरामदायी बनविण्यासह अन्य फिचर्स अपडेटसह सादर होणार आहेत.
सेलेरियो मारुती चालू वर्षात होणारी पहिली कार असून कंपनी या कारचे सादरीकरण करत चिपच्या कमतरतेमुळे विक्रीत झालेले नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि सेल्स कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे.
मारुती सेलेरियो इंजिन
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नवीन सेलेरियोमध्ये नेक्स्ट जनरेशन के सीरीज डुअल जेट, डुअल व्हीव्हीटी इंजिन बेस्ड राहणार असून मायलेज वाढवण्यासाठी स्टार्ट स्टॉप फिचर मिळणार असल्याचेही नमूद केले आहे.