वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार निर्मिती करणारी मारुती सुझुकी इंडियाची मार्च 2020 मधील वाहन विक्री तब्बल 47 टक्क्मयांनी घसरली आहे. या घसरणीसोबत वाहन विक्री 83,792 अंकावर राहिली आहे. मारुतीने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षातील मार्चमध्ये हा विक्रीचा आकडा 1,58,076 इतका राहिला आहे. यात देशातील विक्री मार्च 2019 मध्ये 1,47,613 युनिटवर राहिला आहे. या तुलनेत चालू मार्चमध्ये 46.4 टक्क्मयांनी विक्री घटून 79,080 युनिट्वर राहिली आहे. याच कालावधीत आल्टो आणि वॅग्नार यासारख्या लहान कारची विक्री मात्र 15,988 युनिटवर राहिली. स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायनर सारख्या मॉडेलच्या विक्रीत 50.9 टक्क्मयांनी घसरण होत 40,519 वर स्थिरावली आहे.