भाविकांची आर्त हाक : शहर परिसरातील मंदिरांमध्ये हनुमान जयंती साजरी : कोरोना संकटामुळे अनेक कार्यक्रम केले रद्द
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या तीव्र लाटेचे संकट मारुतीरायानेच दूर करावे, अशी आळवणी करत शहर परिसरात हनुमान जयंती साधेपणाने साजरी झाली. कोविड-19 चे नियम पाळत हनुमान मंदिरांमध्ये सकाळच्या सत्रात पूजाअर्चा, अभिषेक झाला. मंदिरांमध्ये पाळणा बांधण्यात आला आणि हनुमान जन्मोत्सव मोजक्मयाच भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
दरवषी शहरात मोठय़ा उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात येते. अनगोळ येथे हनुमान जयंती दिवशी यात्रा भरते. मात्र, यंदा उत्सवाचे स्वरूप मर्यादित करण्यात आले आणि साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली. मारुती गल्लीतील मारुती मंदिर, खडेबाजार येथील मारुती मंदिर, खडेबाजार पोलीस स्टेशनसमोरील मारुती मंदिर, संचयनी सर्कल येथील उभा मारुती येथे पूजाअर्चा करून प्रसाद वाटप करण्यात आले. घरोघरीसुद्धा मोठय़ा भक्तिभावाने पूजा करण्यात आली. कोरोनाचे संकट तीव्र झाल्याने शक्तीदेवता असणाऱया मारुतीरायाने आता कोरोनाचे संकट दूर करावे, असे गाऱहाणे भाविकांनी घातले.
जयनगर, हिंडलगा मारुती मंदिर
जयनगर, हिंडलगा येथील मारुती मंदिरात अत्यंत साधेपणाने हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त हनुमानाच्या मूर्तीला फुलांची आरास करण्यात आली होती. नियमांचे पालन करून भाविकांनी दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.
पाईपलाईन रोड हनुमान मंदिर
पाईपलाईन रोडवरील हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी महिलांनी पाळणा म्हणून हनुमान जयंती साजरी केली.
वनिता पाटील, वीणा पाटील, लता पाटील, गीता सबणे, पद्मश्री शिंत्रे, द्राक्षायणी पाटील, चैत्रा गरडे, इंदू मोरे यांच्यासह मंदिराचे अध्यक्ष डी. बी. पाटील, सेपेटरी वसंत कांबळे, शंकर किल्लेकर, विनोद चंदगडकर, सदानंद गरडे, राजन टाकळकर, दीपक यादव, महेश शिंत्रे, शेखर शोधले, राजू मुचंडी आदी उपस्थित होते.
अनगोळ येथे हनुमान जयंती साध्या पद्धतीने
अनगोळ येथे दरवषी हनुमान जन्मोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सवानिमित्त शोभेच्या गाडय़ांची मिरवणूक काढण्यात येते. पण कोरोना संसर्गामुळे ही मिरवणूक रद्द करण्यात आली.
चैत्रपौर्णिमेनिमित्त व हनुमान जन्मोत्सवानिमित्त गावात दरवषी मोठय़ा प्रमाणात गाडय़ांची यात्रा साजरी करण्यात येते. मागील वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे ही मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. बैलजोडय़ांची मदलही काढण्यात येते. मात्र, ती मदलही रद्द करण्यात आली.
रघुनाथ पेठ, राजहंस गल्ली, भांदूर गल्ली, लोहार गल्ली, झेरे गल्ली, हणमण्णावर गल्ली, मारुती गल्ली येथील विविध मंडळे बैलजोडय़ांची सजावट करून मिरवणूक काढत असतात. मात्र यावषी ती रद्द करण्यात आली आहे.
नवीन रथाची मिरवणूकही रद्द
मारुती गल्ली येथील मारुती मंदिराचा मानाचा रथ जुना झाला होता. त्यामुळे कारवार येथील कारागिराकडून 15 लाख रुपये खर्च करून नवीन रथाची बांधणी करण्यात आली आहे. मात्र, कोरोनामुळे नवीन रथाची मिरवणूकही रद्द करण्यात आली आहे.
अनगोळ येथील रघुनाथ पेठ, मारुती गल्ली, भांदूर गल्ली येथील तालमीमध्ये तसेच जिन्नाप्पा वस्ताद तालीम, राम कॉलनी, गाडगीळ स्टॉप येथील मारुती मंदिर येथे पहाटे सूर्योदयावेळी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंच कमिटी आणि महिलांच्या उपस्थितीत पाळण्याचा कार्यक्रम झाला. कोरोनाचे नियम पाळत साध्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी करण्यात आली.