नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीने इको या गाडय़ा परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दोषयुक्त अशा 20 हजार गाडय़ा परत मागविल्या आहेत. चाकाच्या रिम आकाराच्या संदर्भात काही दोष असल्याचे कंपनीने सांगितले आहे. 19 जुलै 2021 ते 5 ऑक्टोबर 2021 या दरम्यान ज्या इको गाडय़ांची निर्मिती करण्यात आली होती त्या कंपनी आपल्या ताफ्यामध्ये मागवून घेत आहे.