प्रतिनिधी /बेळगाव
मारुती गल्ली, अनगोळ येथील मारुती मंदिराच्यावतीने नवीन रथ तयार करण्यात आला. या रथाच्या आगमन सोहळय़ाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. अनगोळ येथील मराठी शाळेपासून भव्य मिरवणुकीने रथाचे आगमन झाले. वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात अनगोळच्या मुख्य मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली.
मारुती मंदिराच्या रथाला धार्मिक महत्त्व आहे. मागील अनेक वर्षांपासून या रथातून यात्रेनिमित्त मिरवणूक काढली जाते. जुना रथ खराब झाल्याने नवीन रथ लोकवर्गणीतून तयार करण्यात आला. या रथाच्या आगमन सोहळय़ाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शुक्रवारी सुवासिनी डोक्मयावर मंगलकलश घेऊन शेकडोंच्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. अनगोळमधील मुख्य मार्गांवरून मिरवणूक काढली. यावेळी नगरसेविका शोभा सोमणाचे, प्रमोद पाटील, वनिता सुतार, मूर्तिकार विजय सिमू यांच्या हस्ते पूजन झाले. यावेळी हनुमान युवक मंडळ, व्यायाम शाळा, मारुती गल्ली येथील मंडळांचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.