मुंबई
मारुती सुझुकी ड्राइव्हिंग स्कूल (एमएसडीएस) या भारतातील आघाडीच्या संघटित ड्राइव्हिंग टेनिंग स्कूलने 1.5 दशलक्षांहून अधिक अर्जदारांना यशस्वीरित्या सुरक्षित ड्राइव्हिंगचे प्रशिक्षण दिले आहे.
दर्जेदार ड्रायव्हिंग टेनिंगसाठी यात जागतिक मानांकनांचा समावेश करण्यात आला आहे. अत्याधुनिक ड्राइव्हिंग सिम्युलेटर्स आणि अत्यंत काळजीपूर्वक तयार करण्यात आलेल्या प्रॅक्टिकल आणि थिअरी अभ्यासक्रमाचा समावेश असलेल्या आधुनिक प्रशिक्षण पद्धतीच्या माध्यमातून एमएसडीएसने सातत्याने नवनवे मापदंड रचले आहेत.
या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे (विपणन आणि विक्री) कार्यकारी संचालक श्री. शशांक श्रीवास्तव म्हणाले, भारतभरातील 238 शहरांमधील 492हून अधिक केंद्रांसह भारतातील आघाडीची प्रोफेशनल ड्रायव्हिंग स्कूल चेन ठरली आहे. एमएसडीएसमध्ये शिकणाऱया प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित ड्रायव्हिंगची कौशल्ये शिकवतानाच गाडीची प्राथमिक देखभाल आणि आपतकालीन स्थितीत गाडी कशी हाताळावी याचे परिपूर्ण ज्ञानही दिले जाते. एमएसडीएसच्या माध्यमातून आम्ही 15 लाख लोकांना सुरक्षित ड्रायव्हिंगमध्ये प्रशिक्षित केले आहे. ड्रायव्हिंगचे वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञान देण्याची आमची बांधिलकी या कामगिरीतून अधोरेखित होते.