मुंबई
सुझुकी मोटर्सच्या गुंतवणुकीच्या घोषणेनंतर सोमवारी शेअर बाजारात मारुती सुझुकीचे समभाग 3 टक्के इतके वाढल्याचे दिसले आहेत. कंपनीच्या समभागाचा भाव सोमवारी 7,880 रुपयांवर व्यवहार करत होता. याआधी कंपनीचा समभाग 7,691 रुपयांवर बंद झाला होता. सुझुकी मोटर्स गुजरातमध्ये 10 हजार कोटींची गुंतवणूक इलेक्ट्रिक वाहन व बॅटरी निर्मितीकरीता करणार आहे. या बातमीने सोमवारी मारुतीचे समभाग वधारलेले पाहायला मिळाले.