वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या एरिना सेल्स मॉडेलमार्फत होणाऱया विक्रीने तीन वर्ष पूर्ण केली आहेत. कंपनीच्या एरिना सेल्स शोरुम्सची संख्या 745 इतकी झालेली आहे. कंपनी आपल्या एरिना विक्री नेटवर्कमार्फत आल्टो, एस-प्रेसो, वॅग्नार, सेलेरियो, सेलेरियो एक्स, स्विफ्ट, डिझायनर, विटारा ब्रेझा आणि अर्टिगा यासारख्या कार्सची विक्री करत आली आहे. तसेच कंपनीकडून प्रमुख मॉडेलमध्ये सियाज, बलेनो, इग्निस, एक्सएल 6 आणि एस क्रॉसची विक्री मात्र नेक्सा सेल्स नेटवर्कच्या मदतीने करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. आधुनिक आणि युवा ग्राहकांची इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठीच आम्ही एरिनाची सुरुवात केली असल्याचे एमएसआयचे विपणन आणि विक्री विभागाचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.