नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने येत्या एप्रिलपासून कार्सच्या किमती वाढवण्याचे ठरवले आहे. कंपनीच्या सर्व मॉडेल्सच्या किंमती 1 एप्रिलपासून वाढलेल्या असतील. कच्च्या मालाच्या खर्चात वाढ झाल्याने त्याचा परिणाम उत्पादन खर्चावर होत असल्याने परिणामी कंपनीला कार्सच्या किमती वाढवणे अपरिहार्य ठरणार आहे. मॉडेलनुसार कारच्या किमती वाढवल्या जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. सर्व मॉडेलवरील किंमती 1 ते 6 टक्के इतक्मया वाढू शकतात, असेही सांगितले जात आहे. कंपनीची ही वर्षातील दुसरी किंमत वाढ आहे.