नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती-सुझुकी इंडियाने 31 मार्चला संपलेल्या चौथ्या तिमाहीमध्ये निव्वळ नफ्यामध्ये 51 टक्क्मयांची वाढ दर्शवली आहे.
कंपनीने 31 मार्चला संपलेल्या तिमाहीमध्ये 1 हजार 875 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वषी समान अवधीमध्ये कंपनीने 1241 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. याच दरम्यानच्या काळामध्ये कंपनीच्या महसूलामध्ये 11 टक्के इतकी वाढ झाली असून कंपनीने चौथ्या तिमाहीमध्ये 26 हजार 749 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्यावषी समान तिमाहीत कंपनीने 24 हजार 034 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. आर्थिक वर्ष 2022 मध्ये 26 टक्के इतकी वाढ महसूलात दर्शवली गेली आहे. त्या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये कंपनीने 88 हजार 329 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. 2021 च्या आर्थिक वर्षामध्ये हा आकडा 70 हजार 372 कोटी रुपये होता.