मुंबई : मारूती सुझुकी इंडिया लिमिटेड (एमएसआयएल) ने बुधवारी त्यांच्या बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट हॅचबॅक असलेल्या स्टायलिश अशा ऑल न्यू सेलेरियोला भारतीय बाजारात सादर केले.
भारतातील सर्वाधिक इंधन बचत करणाऱया कारची सुरूवात केल्याची घोषणा कंपनीने केली. ऑल न्यू सेलेरियोकडून सर्वाधिक म्हणजेच 26.68 किमी/लीटरचे मायलेज देण्यात येत आहे. यामध्ये नेक्स्ट जनरेशन डय़ुअल जेट, डय़ुअल व्हीव्हीटी के सिरिज इंजिन असून यांत आयडल स्मार्ट-स्टॉप टेक्नॉलॉजीही पुरवण्यात आली आहे. यामुळे आता अनोखा ड्रायव्हिंग अनुभव प्राप्त होणार आहे. सदरच्या वाहनात नवीन युगातील डिझाईन, अनेक सुरक्षा आणि स्मार्ट वैशिष्टय़े देण्यात आली असून ऑल न्यू सेलेरियोमुळे पुन्हा एकदा कॉम्पॅक्ट हॅचबॅक विभागात क्रांती झाली आहे. गाडीची किंमत 4 लाख 90 हजार ते 6 लाख 90 हजार रुपये इतकी असणार असल्याचे समजते.