मुंबई
मारुती सुझुकी कंपनीच्या सुपर कॅरी या मिनी ट्रक विभागातील वाहनाने नुकताच 1 लाख इतक्या विक्रीचा टप्पा पार केला आहे. गेल्या 5 वर्षामागे सादर करण्यात आलेल्या या वाहनाने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात यश मिळवलं आहे.
4 सिलेंडर इंजिनचे हे एकमेव भारतातील मिनी ट्रक व्यावसायिक वाहन असल्याचे कंपनीने म्हटले आहे. व्यवसायासाठी मालवाहतुकीसाठी याचा वापर आता ग्राहक करू लागले आहेत. पेट्रोल व सीएनजी या इंधनावरच्या पर्यायासह ही गाडी येते. 2016 मध्ये व्यावसायिक वाहनांच्या प्रकारात कंपनी पहिल्यांदा उतरली होती. सीएनजी वाहन 21 किलोमीटर प्रति किलो इतके उत्तम मायलेज देते.