मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारूती सुझुकीची बीएस- 6 शेणीवर आधारीत एस-क्रॉस पुढील महिन्यात 5 ऑगस्टला भारतीय बाजारात दाखल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या नव्या गाडीकरीताचे आगाऊ बुकिंग ग्राहकांना करता येणार असून याकरीता 11 हजार रुपये भरावे लागणार आहेत. कंपनीची एस-क्रॉस ही पेट्रोल इंधनावर चालणारी गाडी आहे. खरंतर ही गाडी 2020 च्या सुरूवातीलाच भारतीय बाजारात उतरवण्याचा कंपनीचा मानस होता. पण मार्चमध्ये कोरोनाच्या फैलावामुळे या गाडीचे लाँचिंग लांबणीवर पडले. नवी गाडी सिग्मा, डेल्टा, झेटा, अल्फा या प्रकारात दाखल होणार आहे.