नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी आघाडीवरची कंपनी मारूती सुझुकीने नुकताच कर्नाटक बँकेसोबत एक करार केला आहे. याअंतर्गत येणाऱया काळात खरेदीदारांना वित्तीय सहाय्य पुरवण्याचे महत्त्वाचे कार्य मारूती सुझुकी करणार आहे. बँकेसोबतच्या भागीदारीनंतर कंपनीला आपल्या वाहनांच्या विक्रीकरीता आणखी पाठबळ मिळणार आहे. यासंदर्भात मारूती सुजुकी व कर्नाटक बँक यांच्यात सहकार्याचा करार (एमओयु) नुकताच पार पडला आहे. कर्नाटक बँकेच्या 858 शाखांमध्ये खरेदीदारांना मारूतीची कार वित्तीय सहकार्यासह (कर्ज) घेणे शक्य होणार आहे.