नवी दिल्ली
देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दरम्यान या कोरोनाच्या लाटेच्या प्रभावाचा परिणाम ऑटो क्षेत्रावर बऱयापैकी जाणवला आहे. दरम्यान कार निर्मिती क्षेत्रातील कंपनी मारूती सुझुकीने आर्थिक वर्षात दुसऱया तिमाहीत कार्सच्या किंमती वाढवण्याचा विचार करत असल्याचे समजते.
कंपनीने विविध मॉडेल्सवरच्या किंमती विविध स्तरावर वाढवल्या जाणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान सदरची दरवाढ ही जुलै-सप्टेंबरमध्ये केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीला अंतर्गत खर्चात वाढ सोसावी लागत असून यामुळेच हा खर्च भरून काढण्यासाठी दरवाढ करणे अपरिहार्य असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भातली योजना कंपनीने आखली आहे. विविध प्रकारच्या अंतर्गत खर्चात वाढ झाली असल्याने परिणामी उत्पादन खर्च वाढला आहे.