वार्ताहर/ किणये
वाघवडे पुनर्वसित केंद्र मार्कंडेयनगर ग्राम पंचायतीच्या नुतन ग्राम पंचायत सदस्यांनी तरुण भारत कार्यालयाला शनिवारी सदिच्छा भेट दिली.
वाघवडे, वाल्मिकीनगर व काळेनट्टी या गावातील नवनिर्वाचित सदस्यांनी भेट देऊन तरुण भारतचे संस्थापक संपादक स्वर्गिय बाबुराव ठाकूर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नवनिर्वाचित सदस्यांमध्ये भावकाण्णा नारायण पाटील, रघुनाथ गिडाप्पा नाईक, वैशाली ज्ञानेश्वर कांबळे, गंगव्वा बसाप्पा नाईक, शुभांगी सुभाष देसाई, पैल्लव्वी पुंडलिक नाईक हे उपस्थित होते. त्यांच्या समवेत गावातील पुंडलिक परशराम नाईक, सुनिल देवाप्पा पाटील, ज्ञानेश्वर दुर्गाप्पा कांबळे आदी उपस्थित होते.
वाघवडे गावातील प्रगतशील शेतकरी व गावातील पंच भावकाण्णा पाटील यांनी यापूर्वी संतिबस्तवाड ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. त्यांनी सीमाभागातील सीमाप्रश्नाच्या लढय़ातही सहभाग घेतलेला आहे. तसेच गावातील जनतेच्या मदतीला ते धावून जातात. यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला आहे.
गावच्या व तिन्ही वॉर्डांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे भावकाण्णा पाटील यांनी सांगितले.