प्रतिनिधी/ सातारा
सातारा मार्केट यार्डात सकाळी बेशिस्तपणे कशीही वाहने उभी केली जात होती. वाहनधारकांनी लावलेल्या कशाही वाहनामुळे वाहतूकीची कोंडी निर्माण झाली होती. त्याबाबत सातारा पोलीस दलातील जवानाने त्या सर्व बेशिस्तपणे उभ्या असलेल्या वाहनांचे नंबर लिहून घेवून त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. काही वाहनधारकांना त्यांनी समजावून सांगितले. दरम्यान, सातारा शहरात बेशिस्तपणे वाहने लावली जात असल्याचा नागरिकांना त्रास होत आहे.