प्रतिनिधी /बेळगाव
जितक्मया श्रद्धेने महिला वटसावित्रीचे व्रत करतात, तितक्मयाच श्रद्धेने त्या मार्गशीर्ष गुरुवार करतात. अर्थातच या गुरुवारी महिलावर्ग लक्ष्मीची पूजा करतो. त्यामुळे बाजारपेठेत या पूजेसाठीचे साहित्य दाखल झाले आहे.
मार्गशिर्षातल्या चार गुरुवारी लक्ष्मीची पूजा केली जाते. पाच फळे, सौभाग्य लेणे आणि कलशामध्ये आंब्याची पाने ठेऊन पूजा केली जाते, किंवा फोटोचीही पूजा केली जाते. या व्रतामुळे कुटुंबामध्ये सुख, समृद्धी येते आणि लक्ष्मीचा वरदहस्त सदैव लाभतो, अशी श्रद्धा आहे.
शेवटच्या गुरुवारी या पूजेचे उद्यापन केले जाते. त्यावेळी मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची महती सांगणारी पुस्तिका ओटीबरोबर वितरित केली जाते. त्यामुळे या पुस्तिकासुद्धा विपेत्यांनी बाजारात विक्रीस ठेवल्या आहेत.