मार्जारासन हे सहजसोपे आणि तितकेच प्रभावी आसन आहे.
- हे आसन करण्यासाठी मांजराप्रमाणे चार पायांवर गुडघ्याच्या व हाताच्या सहाय्याने उभे राहावे. हात जमिनीला लंबरूप ठेवा, हात हे खांद्याच्या बरोबर खाली असले पाहिजेत आणि हाताचे तळवे हे जमिनीवर सपाट असावेत.दोन्ही गुडघ्यांमध्ये नितंबांच्या रुंदीइतके अंतर ठेवावे.दृष्टी समोर सरळ ठेवावी.
- यानंतर आता श्वास आत घ्या. श्वास आत घेताना हनुवटी वर उचलावी आणि डोके मागच्या दिशेला न्यावे, तुमच्या नाभीला खालच्या दिशेला ढकलावे आणि पुच्छहाडाला वर उठवावे.
- या मांजरीच्या पवित्र्यात थोडा वेळ रहा आणि दीर्घ श्वास घ्या.
- आता केलेल्या स्थितीच्या अगदी विरुद्ध स्थिती करा.जसजसे तुम्ही श्वास सोडू लागता तसतसे हनुवटीला छातीकडे आणावे. पाठीची तुमच्या क्षमतेनुसार कमान करा; नितंब सैल सोडा. या स्थितीत थोडे सेकंदे रहा. आता पुन्हा सुरुवातीच्या स्थितीत यावे.
फायदे कोणते?
- मार्जारासनामुळे पाठीच्या कण्याला लवचिकता येते. तसेच मनगटे आणि खांद्यांना बळकटी प्राप्त होते. या आसनाने पचनेद्रीयांना मालिश होते आणि पचनक्रिया सुधारते. उदर सुडौल बनते.
- याखेरीज मन शांत बनते आणि रक्ताभिसरण सुधारते.