मार्सेली
: प्रेंच लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया ऑलिंपिक डी मार्सेली क्लबचे माजी अध्यक्ष पेप डिऑफ यांचे मंगळवारी वयाच्या 68 व्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे निधन झाले. सदर माहिती ऑलिंपिक मार्सेली क्लबच्या ट्विटरवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ऑलिंपिक डी मार्सेली क्लबच्या यशामध्ये डिऑफ यांचा वाटा महत्त्वाचा ठरला आहे. डिऑफ यांच्यावर सेनेगलची राजधानी डकार येथे वैद्यकीय इलाज चालू होता. 2005 ते 2009 या कालावधीत डिऑफ ते मार्सेली क्लबचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत मार्सेली क्लबने दोनवेळा प्रेंच लीग-1 फुटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले होते. प्रेंच फुटबॉल फेडरेशनतर्फे डिऑफ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.