मार्सेली (फ्रान्स)
एटीपी टूरवरील येथे झालेल्या खुल्या मार्सेली प्रोव्हिन्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत रशियाच्या आंद्रे रूबलेव्हने कॅनडाच्या फेलिक्स ऑगर ऍलियासिमेचा 7-5, 7-6 (7-4) अशा सेट्समध्ये पराभव करून एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
एटीपी टूरवरील 250 दर्जाच्या या स्पर्धेत रूबलेव्हने अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना फ्रान्सच्या तीन टेनिसपटूंचा पराभव केला. रूबलेव्हने गेल्यावर्षीच्या मार्चमध्ये रोटरडॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्याचे हे पहिले विजेतेपद आहे. मार्सेली स्पर्धेतील हा अंतिम सामना दोन तास चालला होता.