धारदार हत्यारे, मोबाईल जप्त, वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्याच्या पूर्व भागात वाढणाऱ्या चोरी आणि लुटमारी सारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मिरज शहर, ग्रामीण, महात्मा गांधीचौकी आणि मिरज एमआयडीसी पेलिस ठाण्याच्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तिकपणे ग्रामीण भागात कोंबिंग ऑपरेशन राबविले.
शुक्रवारी रात्री मालगांव आणि सिध्देवाडी येथे झोपडपट्टय़ा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांच्या वस्तीवर कोंबिंग ऑपरेशन राबवून घोगरी ताजमल भोसले या गुन्हेगाराकडून धारदार हत्यारे, चोरीचे मोबाईल असा 36 हजार, 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.