वार्ताहर/ गणपतीपुळे
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील एका 16 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सविस्तर वृत्त पोलिसांकडून असे की, मालगुंड येथील कु. सानिका अशोक सोनार (वय 16) या मुलीने आपल्या राहत्या घरात सकाळी 9.30 वाजता नायलॉनच्या दोरीने गळफास लावला. तिचे वडील अशोक सोनार व आई हे सकाळी मंदिरामध्ये गेले असताना सानिका हिने राहत्या घरामध्ये बेडरुममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजले. मुलगी घरात असून हाका मारुनसुद्धा बाहेर येत नाही म्हणून तिचे वडील अशोक सोनार यांनी किचनचा पाठीमागील दरवाजा उचकटून आतमध्ये प्रवेश केला असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. याची खबर येथील स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर त्यंनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन मृत्यू बॉडी शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड याठिकाणा पाठवण्यात आली. याठिकाणी प्रा†िथमक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश बाबुराव सोनवणे यांनी शवविच्छेदन करुन बॉडी. सायंकाळी 5 वा. नातेवाईकांच्या ताब्यात दिली. याबाबत अधिक तपास गणपतीपुळे पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संदिप साळवी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत लोहाळकर करत आहेत.