ऑनलाईन टीम / माले :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले मालदीव 15 जुलैपासून आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी खुले होत आहे. मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहंमद सोलिह यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी मालदिव सरकारने हिंदी महासागरातील देशांसाठी आपल्या सीमा खुल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन काळात 27 मार्चपासून मालदीव पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र, विस्कटलेली आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी आता मालदीवमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मालदीव 15 जुलैपासून पर्यटनासाठी खुले करण्यात येणार आहे.
पर्यटकांसाठी रिसॉर्ट, मरिनाज, हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू केल जाणार आहेत. तर बेटांवरील गेस्ट हाऊस आणि हॉटेल एक ऑगस्टपासून सुरु होणार आहेत. कोणत्याही कोरोना संशयित किंवा बाधिताने मालदीवला भेट देऊ नये, असेही आवाहनही सोलिह यांनी केले आहे.