सुदैवाने जीवितहानी टळली
प्रतिनिधी /पेडणे
मालपे पेडणे येथे रस्त्यावर खड्डे असल्यामुळे आणि ब्रेकफेल झाल्यामुळे ट्रक नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे उलटून पडला. के.ए. 02 -9377 क्रमांकाचा ट्रक महाराष्ट्र मधून गोव्यात येत होता. पेडणे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.
दरम्यान, या अपघाताबद्दल मिशन फोर लोकल संघटनेचे प्रवक्ते राजू नर्से आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, या ठिकाणी दिवसेंदिवस अपघात होत आहेत. यापूर्वी येथील स्थानिकांची मागणी होती की अगोदर सर्विस रोड व्यवस्थित करा आणि मग हायवेचे काम करा, परंतु यावर कोणीच लक्ष दिले नाही. या जागी मोठ-मोठे अपघात झालेले आहेत. हल्लीच मंत्री बाबू आजगावकर आणि दीपक पाउसकर या रस्त्याची पाहणी केली होती, मात्र लोकांच्या मागणीकडे दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे लोक जीव मुठीत धरून या मार्गावर प्रवास करीत आहेत.