प्रतिनिधी /पेडणे
रविवारी रात्रौ 11 वाजता मालवाहू कंटेनर मालपे येथे सर्व्हिस रोड वरून मालपे उतरणीवर खोल क?बिनचा दर्शनी भाग कोसळला. चालकाचा गाडीवरचा ताबा गेल्याने हा अपघात झाला.तर मुख्य मागील भाग हा सर्व्हिस रोडवर कोसळला.
कंटनेच्या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच ते घटनास्थळी धावले. यावेळी कंटेनरचा चालक केबिनमध्ये अडकून पडलेल्या स्थितीत होता, व चालक ओरडत होता.चालकाच्या पायाला जबर दुखापत झाली होती. त्याच वेळी, अग्निशामक दलाचे सहाय्यक अधिकारी मालपे येथे घरी होते, ते सुद्धा घटनास्थळी हजर झाला, त्याने पहिल्यांदा आपल्या ऑफिसला फोन केला, व त्याने कुठलीही वेळ न घालवता, चालकाला केबिनमधून स्थानिकांच्या व अग्निशामक दलाच्या सहकार्याने, चालकाला दरीतून बाहेर काढले.
विशेष म्हणजे प्रशांत धारगळकर डय़?टीवर रजेवर आसताना सुद्धा, चालकाला सुखरूप बाहेर काढले, चालक मूळ सांगली गावचा असून कंटेनर क्रमांक एम एच व्हाय 4521 असून चालकाचे नाव अजय गिरी असे आहे. चालकाला 108 या रुग्ण वाहिकेमून तुये आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
या मोहिमेत प्रशांत धारगळकर , सदानंद सवाळ, सागर मळेवाडकर, नितेश ” वाडकर, अनिकेत नाईक, विनोद सवाळ देसाई, दशरथ ,राजू किंनळेकर व अग्निशामक दलाचे सहायक अधिकारी जयराम मळिक, हवालदार फटू नाईक, चालक प्रमोद गवंडी, जवान रतन परब, श्याम आरोनदेकर, येशवंत नाईक, केतन कामुलकर आणि मयूर नाईक यांनी विशेष प्रयत्न केले.