पेडणे (प्रतिनिधी )
मालपे ज?क्शनवर रेती वाहतूक करणारा ट्रक उलटला. ट्राकच्या क?बिनमध्ये अडकलेल्या चालकाला पेडणे अग्निशमन काढले सुखरुप बाहेर.
शनिवारी दुपारी हा ट्रक पणजीहून भालखाजन येथे रेती आणण्यासाठी जात असताना उलटला. या ट्रकचा चालक हरपल सिंग हा ट्रकच्या क?बिन मध्ये अडकून पडला होता. माञ पेडणे अग्निशमन दलाच्या जवानानी त्याला सुखरूप बाहेर काढले.
रेती वाहतूक करणारा जीए 0टी 2666. या क्रमांकाचा ट्रक हा रेती भरण्यासाठी पणजीहून सुटून भालखाजन कोरगाव येथे जात होता. मालपे पेडणे येथे दुपारी हा ट्रक पेडणे च्या बाजूने येण्यासाठी हायवेवरुन आतील रस्त्याने वळविल्या नंतर मालपे ज?क्शनच्या जवळच पोचला असता ट्रकचा शापटा तुटल्याने ट्रक उजावा बाजूने असलेल्या दरीत गेल्याने उलटला.
ड़ याच दरम्यान पेडणे अग्निशमन दलाचा जवान विष्णूदत्त परब या मार्गाने जात असताना त्यांनी हा आपघात पाहिल्यावर लगेच पेडणे अग्निशमन दलाला संपर्क साधला असता काही तीन मिनिटातच पेडणे अग्निशमन दलाची गाडी आली आणि अग्निशमन दलाच्या जवानानी ट्रकच्या क?बीनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले व 108 रुग्णसेवाला संपर्क साधून तुये येथे आरोग्य केंद्रात नेले. चालकाला किरकोळ इजा झाली.
पेडणे आग्निशमन दलाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर, रामदास परब , सदाशिव चोडणकर, विशाल पाटील, रतन परब , संदेश पेडणेकर तसेच विष्णूदत्त परब यांनी अपघातात सापडालेला चालकाला सुखरुप बाहेर काढले.