मालवण / प्रतिनिधी-
मालवणचे माजी नगरसेवक भालचंद्र उर्फ बाळू कोळंबकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. कोळंबकर हे आक्रमक नगरसेवक म्हणून ओळखले जात. सध्या ते भाजपचे पदाधिकारी होते. नारायण राणे यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात. त्यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे.