मालवण:
चिपळुण महापुरातील बचावकार्यात सहभाग दर्शविणाऱया मालवण आपत्कालीन टीमचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सिंधुदुर्गनगरी येथे गौरव करण्यात याला.
यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, आपत्कालीन टीमचे दामोदर तोडणकर, सचिन गोवेकर, वैभव खोबरेकर आणि अन्य सहकारी उपस्थित होते. मालवणची आपत्कालीन टीम वेळोवेळी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत बचावकार्यासाठी पुढाकार घेत असते. आपत्कालीन टीमचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.