प्लास्टिक, काच, लोखंड, चप्पल, टायर, कपडे, करवंटी होणार एकाचवेळी वेगळी : खत मिश्रित मातीही मिळणार एकाच मशिनरीतून अनेक हातांचे काम सिंधुदुर्ग जिल्हय़ात पालिकेचा पहिला प्रकल्प
प्रतिनिधी / मालवण:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात प्रथमच घनकचऱयावर शास्रोक्त बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करण्याचा मान मालवण पालिकेला मिळाला आहे. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी यासाठी खास प्रयत्न केले. शहरातील घनकचऱयावर शास्त्राsक्त बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया झाल्यास त्यातून चांगल्या प्रकारच्या खताचीही निर्मिती होणार आहे. असे काम यापूर्वी राज्यातील श्रीवर्धन, खोपोली नगर परिषदेनंतर आता मालवण नगर पालिकेतर्फे करण्यात येत आहे. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या प्रक्रिया प्रकल्पाचे शुक्रवारी उद्घाटन झाले.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, बांधकाम सभापती यतीन खोत, आरोग्य सभापती पूजा सरकारे, तृप्ती मयेकर, दर्शना कासवकर, मंदार केणी, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, जगदिश गावकर, पूजा करलकर, सेजल परब, पंकज सादये, नितीन वाळके, ममता वराडकर, सुनीता जाधव, शीला गिरकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, सन्मेश परब, गणेश कुडाळकर, उमेश मांजरेकर, किसन मांजरेकर, भाई कासवकर, बाळू नाटेकर, आरोग्य निरीक्षक विजय खरात, मुकादम वळंजू आदी उपस्थित होते.
दिलेला शब्द पूर्ण करणार – आमदार
मालवण पालिकेने शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी अनेक योजना हाती घेतल्या आहेत. यातील महत्वाकांक्षी भुयारी गटार योजना लवकरच पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. नुकतीच त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे आढावा बैठक घेण्यात आली. आता कचऱयावर प्रक्रिया करणाऱया प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे. मालवणवासियांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत, असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.
एक कोटी रुपयांची मशिनरी
यासाठी बसविण्यात आलेली मशिनरी सुमारे एक कोटी रुपये किंमतीची आहे. मालवण पालिकेच्या आडारी येथील डंपिंग ग्राऊंडवरील अस्तित्वातील घनकचऱयावर शास्रोक्त बायोमायनिंग पद्धतीने प्रक्रिया करणे व व्यवस्थापन करण्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम 28 लाख 34 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात आडारी डंपिंग ग्राऊंड येथील प्रक्रिया न करता येणारा साठविलेला कचरा सुमारे 6500 कम बायो मायनिंग (Bio-Mining) या शास्त्राsक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मीरा स्टिल फॅब्रिकेशन ऍण्ड फायबर्सकरिता प्रो. प्रा. सतीश शिवाजी माळी, गांधी चौकनजीक, मिरज- सांगलीमार्फत हे काम केले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवालाला 9 एप्रिल 2018 रोजी मंजुरी दिलेली आहे. हे काम दोन ते अडीच महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. शासनाकडून पुन्हा या कामासाठी मुदतवाढ मागण्यासाठी पालिका प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत. या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे.
खत म़िश्रित माती वेगळी होणार
या कामात शास्रोक्त पद्धतीने घनकचऱयावर प्रक्रिया करून प्लास्टिक, काच, दगड, लोखंड, चप्पल, टायर, कपडे, नारळाची करवंटी इत्यादीचे वर्गिकरण करून खत मिश्रित माती वेगळी करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेला खत विक्रीपासूनही फायदा मिळणार आहे. लोखंड, करवंटी, प्लास्टिक यासाठीही व्यवस्था निर्माण केल्यास त्यापासूनही उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.