मालवण/ वार्ताहर –
३४ दिवसानंतर मालवण आगारातून सोमवारी सकाळी 9.45 वाजता मालवण कट्टा ओरोस ही बस फेरी सोडण्यात आली. यावेळी आगारप्रमुख सचेतन बोवलेकर, उदय खरात, अमोल कामते, प्रसाद बांदेकर, ए. जी. वाघमारे, जी. वाय. गोळवणकर, एसटी चालक ए. जे. भोगवेकर, वाहक एम. एन. आंबेसकर आदि उपस्थित होते. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आवाहनानुसार एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असे आवाहन आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी केले आहे.