मालवण /वार्ताहर –
मालवण एसटी आगारातून बुधवारपासून मालवण रत्नागिरी (सकाळी 8.30 वाजता) व मालवण कोल्हापूर (दुपारी 2 वाजता) बस फेरी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली आहे. मालवण कुडाळ मार्गावर 8 फेऱ्या, मालवण कणकवली मार्गावर 2 फेऱ्या, मालवण वेंगुर्ले मार्गावर दोन फेऱ्या, मालवण देवगड मार्गावर दोन बस फेऱ्या सुरु करण्यात आल्या असून या बसफेऱ्यांचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन बोवलेकर यांनी केले आहे.