मालवण/प्रतिनिधी-
मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीतर्फे मालवण तालुक्यातील गाबित समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ जानेवारी महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात येणार आहे. तरी २०२0-२१ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, डिग्री, शिष्यवृत्ती, बीडीएस आदी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील गाबित समाज विद्यार्थ्यांनी आपली नावे गुणपत्रिकेसह गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्था मालवण कार्यालय आणि गाबित समाज मालवण तालुका कार्यकारिणी उपाध्यक्षा चारुशीला आचरेकर 9404344322 यांच्याकडे ३० डिसेंबरपर्यंत सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.