मालवण :
मान्सून कालावधीत आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचा बचाव करण्याच्या दृष्टीने मालवण पोलिसांचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर गुरुवारी मसुरे गडनदी, खोत जुवा बेट आदी भागात संपन्न झाले.
मालवण पोलीस ठाण्यात उपलब्ध जेमिनी क्राफ्ट रबरी बोटीच्या माध्यमातून मसुरे गडनदी, खोत जुवा या परिसरामध्ये सागरी सुरक्षा शाखेतील अधिकारी साठे, अहमद व अंमलदार चंदनशिवे यांच्या प्रशिक्षणात हे शिबीर संपन्न झाले. बोट प्रत्यक्ष पाण्यामध्ये उतरवून बोट चालवण्याचे व बोटीतील साहित्य हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, पोलीस अंमलदार बाबा गिरकर, नाईक, कदम, ढोले, खोत, पुटवाड जाधव, चिपकर, आचरेकर फरांदे, जायभाय आदी उपस्थित होते.