आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ
मालवण / प्रतिनिधी-
मालवण ग्रामीण रुग्णालयात २० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज डीसीएचसी सेंटर आजपासून सुरु करण्यात आले आहे.कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा शुभारंभ करण्यात आला. या डीसीएचसी सेंटर मध्ये ५० जंबो ऑक्सिजन सिलेंडर, ५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर तसेच यंत्रसामग्री, औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. त्याचबरोबर रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, डॉ. कपिल मेस्त्री, डॉ. प्रफुल्ल सावंत सेवा देणार आहेत यांसह चार नर्स, वोर्डबॉय नेमण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचाराची चांगली सोय उपलब्ध झाली आहे.मालवण शहराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांना याचा लाभ होणार आहे.