प्रतिनिधी /पर्वरी
येथील कर्नाटक बँकजवळ काल रात्री एक वाजता MH 09 CU 4755 हा मालवाहू ट्रक म्हापसाहून पणजीला जात असताना रस्ता विभाजकाला धडक देऊन रस्त्याच्या मधोमध उलटला. त्याच्या पाठीमागून येणाऱया मारूती कारचे GA 07 L 0449 नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सकाळपर्यंत वाहतूक जाम होती. त्या नंतर वाहतूक पोलीस ट्रक रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पर्वरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास करीत आहेत.