प्रतिनिधी / बेळगाव
येथील मालाबार गोल्ड अँड डायमंड्स या प्रसिद्ध शोरुमच्यावतीने कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये गरजूंना अन्नधान्य पाकिटांचे वाटप करण्यात आले. वडगाव भागात 120 पाकिटे आणि शहापूर येथील दैवज्ञ सेवा संघ यांना 150 पाकिटांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक रतन मासेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संवाद मोहम्मद, सुरज अणवेकर, आनंद बुलबुले हे मालाबारचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.