आकर्षक योजनांचे सादरीकरण
प्रतिनिधी / बेळगाव
जगातील सोने तसेच हिऱयांच्या दागिन्यांचे सर्वात मोठे रिटेल चेन असलेल्या मालाबार गोल्ड ऍण्ड डायमंड्सने बेळगाव येथील स्वतःच्या दालनात सिल्व्हर शोच्या नवीन आवृत्तीचा शुभारंभ केला आहे. या विशेष योजनेत गुणवत्तायुक्त चांदीचे दागिने तसेच अन्य साहित्य ग्राहकांना पाहण्यास मिळत आहेत. 5 हजार रुपयांच्या चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर कंपनीकडून 500 रुपये किमतीचे स्टर्लिंग चांदीचे दागिने मोफत दिले जाणार आहेत. हा शो चांदीच्या दागिन्यांच्या मोठय़ा कलेक्शनसह 13 ते 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. प्रतिबद्धतेचा भाग म्हणून मालाबार गोल्ड ऍण्ड डायमंड्सकडून ग्राहकांना 10 प्रॉमिसेस देण्यात आली आहेत. पारदर्शक किंमत टॅगसह अचूक निर्मिती खर्च, स्टोनचे वजन, एकूण वजन आणि ज्वेलरीमधील स्टोनचे मूल्य, दागिन्यांची कायमस्वरुपी मोफत देखभाल, जुन्या सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीवेळी 100 टक्के मूल्य तसेच एक्स्चेंजसाठी कुठलेच शुल्क न आकारणे, सोन्याच्या शुद्धतेचे 100 टक्के बीआयएस हॉलमार्पिंग प्रमाणन, जागतिक मापदंडानुसार 28 सूत्री गुणवत्ता तपासणीसह आयजीआय आणि जीआयए प्रमाणित हिरे, पुनर्खरेदीची हमी, गुणवत्ता पडताळणीसाठी कॅरेट ऍनालायजर इत्यादी गोष्टी मालाबार गोल्ड ऍण्ड डायमंड्सकडून ग्राहकांना मिळत आहेत.