ऑनलाईन टीम /नाशिक :
नाशिकच्या मालेगावात आज 27 नव्या कोरोनाबधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे मालेगावातील कोरोनाबधितांची संख्या आता 325 वर पोहचली आहे.
मालेगावातील कोरोना चाचणी केलेल्या संशयीत रूग्णांपैकी 128 जनांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी 91 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 37 जणांचे पॉझिटिव्ह आले. यामधील 10 जणांचे अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात मागील 24 तासात 790 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 12 हजार 296 वर पोहचली आहे. तर मृतांचा आकडा 521 आहे. राज्यातील दोन हजार रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.