कणबर्गी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे उत्तम प्रकारे काम करत आहेत. असे असताना काही जण त्यांच्या विरोधात तक्रार करत आहेत. रात्रीच्यावेळी गस्त घालणे तसेच महिलांना संरक्षण देणे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. तेंव्हा तक्रार करणाऱयांमागे वेगळेच कारण असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी संबंधित तक्रारीची चौकशी करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी कणबर्गी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रात्रीच्यावेळी मद्य पिवून तसेच गांधीनगर परिसरात रात्री दीडपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यात येत आहे. त्या विरोधात त्यांनी कारवाई केली. यामुळे जाणूनबुजून त्यांच्या विरोधात तक्रार करत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. सुनील पाटील यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये. ते कायद्याच्या चौकटीत आपले काम करत आहेत.
तेंव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी याची दखल घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी नगरसेवक शांतीनाथ बुडवी, व्ही. एस. हलभांवी, भरमगौडा पाटील, अमित चौगुले, ऍड. एन. बी. निर्वाणी, भीमगौडा पाटील, विनोद पाटील, महेश रेडेकर, अरुण येळ्ळूरकर, एस. पी. पाटील, डी. टी. बस्तवाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते