वडूज / प्रतिनिधी :
माळशिरस तालुक्यातील युवकाचा तडवळे ता. खटाव येथे दुचाकी अपघातात मृत्यू झाला. रामचंद्र विजय चव्हाण (वय 38) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
या बाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहीती अशी की, माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील रामचंद्र चव्हाण हा ड्रायव्हींगचा व्यवसाय करत होता. दुचाकी (क्र. एम.मच.42 ए.बी. 7108) देण्यासाठी तो कोल्हापुर येथे निघाला होता. शिंदेवाडी ते कोल्हापुर असा रात्रीचा प्रवास करत असताना तडवळे ता. खटाव येथे खाडे वस्तीवरील पुलावरुन कठडा तोडुन दुचाकीसह तो खाली पडला. त्याचे डोके दगडावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात रात्रीचा घडल्याने तसेच दुचाकी आणि रामचंद्र झाडीत पडल्याने ही बाब कोणच्याही निदर्शनास आली नाही. परिसरात दुर्गंधी सुटल्याने या अपघाताची माहीती मिळली. रामचंद्र घरी न आल्याने कुटुंबिय चिंतेत होते. पाचव्या दिवशी त्याच्या अपघाताची बातमी मिळाल्याने चव्हाण कुटुंबीयांना धक्का बसला. या घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दिक्षित करीत आहेत.