प्रतिनिधी /बेळगाव
किल्ला तलावानजीक तसेच रेल्वे स्थानकानजीकच्या झोपडपट्टीतील गरीब व गरजूंसह इतर भाजीमार्केटमधील गरिबांना माळी गल्ली-बेळगाव येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळाच्यावतीने अन्नपाकिटांचे वितरण करण्यात आले. रविवारी लॉकडाऊन काळात 100 हून अधिक जणांना या पाकिटांचे वितरण केले. अन्नाची पाकिटे मिळाल्याने अनेकांच्या चेहऱयावर समाधान दिसून आले. बालाजी फुटवेअरचे संचालक हरिष, महालक्ष्मी स्टिल सेंटरचे मालक राजू शहापूरकर, मदन मोदगेकर, प्रदीप दरवंदर, गौरव कल्याणकर, पिंटू बडसकर, विकी मेडिकलचे मालक संतोष राजगोळकर, सोमनाथ हलगेकर यांच्यासह हरिषचंद्र मेहता, माळी गल्ली, कामत गल्ली आणि पांगूळ गल्ली येथील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून हा अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. माळी गल्ली मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे, विनोद लोहार, प्रभाकर बामणेकर, बसवराज मेसर्गी, अशोक कदम, प्रतीक बडमंजी, भूषण हेब्बाळकर, भाऊराव चौगुले, अभिजित लंगरकांडे, सचिन कदम, मिलिंद बामणेकर, रविंद्र जाधव यांनी अन्नपाकिटांचे वितरण केले.