प्रतिनिधी / बेळगाव
येथील माळी गल्ली युवक मंडळ आणि महिला मंडळाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी उपमहापौर आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर उपस्थित होत्या.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवमूर्तीला पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हणण्यात आला. यावेळी माळी गल्ली महिला मंडळ आणि युवक मंडळाच्यावतीने उपस्थित नागरिकांना रोगप्रतिकारक शक्तिवर्धक गोळय़ांचे (इम्युनिटी बुस्टर) वाटप करण्यात आले.
यावेळी मेघन लंगरकांडे, भाऊराव चौगुले, अभिजित लंगरकांडे, उमेश ताशिलदार, प्रभाकर बामणेकर, भूषण हेब्बाळकर, प्रतीक बडमंजी, भाऊ कित्तूरकर, अनुराधा चौगुले, प्रेमा बामणेकर, मनीषा काकडे, सुरेखा वांदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.