प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापुरात नव्याने स्थापन झालेल्या माळी महासंघ कोल्हापूर जिल्हा या संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. संभाजीराव गोरे तर महासचिवपदी रामलिंग नाळे यांची नियुक्ती करण्यात आली. महासंघाच्या वतीने वर्षभर समाजबांधवासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. संघटनेची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत संघटनेची कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये प्रा. गोरे यांची अध्यक्ष, गुरुबाळ माळी उपाध्यक्ष तर देवेंद्र रास्कर यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
या बैठकीत नियुक्त करण्यात आलेली इतर कार्यकारिणी अशी. रामलिंग नाळे (महासचिव), अंकुश बनसोडे (सचिव), संदीप पुंड (सचिव) , अशोक माळी (सचिव), मनोज सातव (सहसचिव), बाबासाहेब चपाले (सहसचिव), विष्णू अडत (सहसचिव), शिवानंद माळी ( कोषाध्यक्ष)