वार्ताहर/ माशेल
वसंतराव देशपांडे यांनी आपल्या गायिकेतून अजरामर केलेली नाटय़गीते, शास्त्रिय, उपशास्त्रिय गीते लोकांपर्यंत पोहविण्याचे काम त्याचे नातू आघाडीचे गायक राहूल देशपांडे करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वसंतराव जन्मशताब्दी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वसंतोत्सव कार्यक्रम माशेल येथील बीग बी सभागृहात काल शनिवारी सायंकाळी संपन्न झाला. राहूल देशपांडे यांच्या गायनाने माशेलातील रसिक मंत्रमुग्ध झाले.
यशवंत तळावलीकर, पुरूषोत्तम केणी कुटूंबियांच्यातर्फे गोमंतकीयांना सांगितीक भेट दिलेली आहे. एमआयटी युनिर्व्हसिटी, वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान, लोकमान्य मल्टिपर्पज कॉ ऑप सोसायटी, ईएसजी व सम्राट क्लब माशेल यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
‘माशेल पंचक्रोशीत रंगला वसंतोत्सव’
मागील पंधरा वर्षे वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे सदर कार्यक्रम महाराष्ट्र व इतर राज्यात सादर केला जातो. कोविड काळामुळे खंड पडलेल्या वसंतोत्सव गोव्यातील रसिकांपर्यत पोचवून प्रारंभ करण्यात येत आहे. वसंतराव देशपांडे यांनी गायिलेल्या गीते, शास्त्रिय, उपशास्त्रिय तसेच गीते लोकांपर्यंत पोहविण्याचे काम त्याचे नातू राहूल देशपांडे याचा एक सांगितीक उपक्रम आहे.
कार्यक्रमाची सुरूवात अपर्णा तळावलीकर, चैतन्य गीते, वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे राजस उपाध्ये, लोकमान्यचे ऍन्थोनी अजावेद, गायत्री दुभाषी नायक यांच्याहस्ते दिप प्रज्ज्वलनाने सुरूवात करण्यात आली. यावेळी चैतन्य गीते यानी विचार मांडले.
तद्नंतर वसंतोत्सव कार्यक्रमास सुरूवात झाली. प्रमूख गायक राहूल देशपांडे यांनी रवी मी चंद्र कसा…. या गीताने झाली. गायिका प्रियांका बर्वे व राहूल देशपांडे यांनी प्रथम तुला वंदितो हे सुंदर गीत गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर अनेक सुरमय गीते राहूल देशपांडे व प्रियांका बर्वे यांनी सादर केली. हार्मोनियमवर मिलींद कुलकर्णी, तबल्यावर निखिल फाटक, पखवाज प्रसाद जोशी, साईड रिदम रोहण वागणे, किबोर्ड अनय गाडगीळ यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चिन्मय घैसास यांनी केले.