प्रतिनिधी/ कुंभारजुवे
कोरोनामुळे आमच्या सोसायटीच्या आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत संचालक मंडळाने ठेवलेल्या उद्दीष्टांवर काही प्रमाणात परिणाम झालेला आहे. तरी यंदा सोसायटीने 40 कोटींचा धंदा केलेला आहे व ते गेल्यावर्षापेक्षा 7 कोटी जास्त आहे. यावर्षी 26 कोटी 58 लाख डिपॉझीट आले असून ते गेल्यावर्षापेक्षा 4 कोटी 64 लाख रु. जास्त आहे. सोसायटीच्या शिक्षण योजनेअंतर्गत भागधारकांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी शिक्षण क्षेत्राच्या तज्ञांची समिती स्थापून त्यांची अंतलबजावणी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या वर्षी संस्थेला 30 वर्षे पूर्ण होत आहे. संस्थेचे एकूण 8240 भागधारक आहेत. तरी संचालक मंडळाने 5 वर्षाच्या कार्यकाळात 50 कोटीचे कर्ज देण्याचा पल्ला निश्चित केला आहे, अशी माहिती आमसभेत बोलताना सोसायटीचे चेअरमन ऍड. विनायक नार्वेकर यांनी दिली.
माशेल येथील माशेल अर्बन कॉ.ऑप. क्रेडीट सोसायटीच्या 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन ऍड. विनायक नार्वेकर श्री गंजातलक्ष्मी सभागृह माशेल येथे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन प्रकाश नाईक, संचालक विकास भगत, शांताराम वरगांवकर, रामानंद तारी, पुरुषोत्तम फडते, अर्जुन नाईक, सतीश नाईक, बाबी चोडणकर, भानुदास गांवकर, पुष्पा आमोणकर, विमल नाईक, सिताराम गावडे, हेमंत नाईक, प्रमोद नाईक, व्यंकटेश शेणॉय उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेला उपस्थित भागधारक व संचालकांचे चेअरमन ऍड. विनायक नार्वेकर यांनी स्वागत केले.
सोसायटीने सीबीएस सॉफ्टवेअर कार्यान्वित केल्याने खातेदारांची चांगली सोय झाली असूत त्यांना आमच्या चारही शाखांमध्ये व्यवहार करता येईल.
आमचे स्टेटय़ूटरी ऑडिटर व्यंकटेश शेणॉय यांनी सोसायटीच्या कामकाजाविषयी गौरवोद्गार काढले असून यंदाही अ वर्ग मिळाला आहे. सोसायटीच्या कामकाजांविषयी सखोल अभ्यास व्हावा या दृष्टीकोनातून उपसमिती नेमून त्यांचा अहवाल संचालक मंडळाकडे संपूर्द केला जातो. सोसायटीतर्फे शाळांना लायब्ररी सामानाअंतर्गत आठ हजारांची कपाटे व पुस्तके देण्यात आली आहेत. शिवाय कुंभारजुवे व सांतइस्तेव्ह येथे दोन मोफत आरोग्य तपासणी शिबिरे व मोफत औषधे देण्यात आली, अशी माहिती पुढे बोलताना चेअरमन ऍड. विनायक नार्वेकर यांनी दिली.
या आमसेभेत नंदकुमार भगत, सुरेंद्र गोवेकर, अनिल फडते, अविनाश कामत, राजाराम वळवईकर, गुरुदास कोरगांवकर, धर्मानंद खोलकर, उमेश नाईक, ऍड. श्रीकांत परब, ऍड. दीपक शेट, अरविंद आमोणकर, विनय गांवकर आदींनी चर्चेत भाग घेऊन विविध सुचना केल्या. आमसभेत सादर केलेल्या विविध ठरावांवर अनुमती घेण्यात आली. याप्रसंगी सोसायटीच्या आर्थिक व्यवहारात चांगले कार्य केल्याबद्दल संतोष गोविंद भंडारी, देवानंद सिताराम नाईक, डॉ. मोतीराम पांडुरंग केदारे, ब्रिजेश मधूकर गांवकर, गुरुदास गोपाळ कोरगावकर, सुरेंद्र सगुण नाईक, केशवराव सातबा नाईक, युवराज तानाजी नाईक, गीता विजयकांत नमशीकर, उमाकांत नागेश नाईक यांचा चेअरमन ऍड. विनायक नार्वेकर यांच्या हस्ते शाल व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.