प्रतिनिधी / कुंभारजुवे
वाचनाचे महत्त्व अगदी पूर्वीपासून आहे. मुलांच्या हातात पुस्तक राहिल्याने त्याला वाचनाची आवड निर्माण होते याची जाण प्रत्येक पालकांने ठेवली पाहिजे. शाळेची पाठय़पुस्तके ज्ञानांसाठी व अन्य पुस्तके ज्ञान वृद्धीसाठी आहे. मुलांची मतिश वाचनाने उजळते व भविष्यात तो यशस्वी होण्यास त्याला हातभार लावते याचसाठी पालकांनी मुलांना भेटवस्तू देताना अन्य काही देण्याऐवजी त्याला पुस्तके भेट द्यावी. जेणेकरुन त्याला पूस्तकांची गोडी लागेल. भविष्यात त्याला विशेष उजळणी वर्गाची गरज भासणार नाही असे उद्गार ज्येष्ठ शिक्षक अशोक तिळवी यांनी काढले.
माशेल चिमुलवाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेत माशेल अर्बन कॉ. ऑप क्रिडिट सोसायटीतर्फे कपाट व पुस्तके प्रदान कार्यक्रमात खास अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक अशोक तिळवी बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर माशेल अर्बन कॉ.ऑप पेडिट सोसायटचे चेअरमन ऍड. विनायक नार्वेकर, वाईस चेअरमन प्रकाश नाईक, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सर्वेश फूलारी उपस्थित होते.
मान्यवरांचे शिक्षिका अनुजा नाईक हिने गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सोसायटीचे वाईस चेअरमन प्रकाश नाईक यांनी फित कापून कपाट व पुस्तके अध्यक्ष सर्वेश फुलारी यांच्याकडे पुस्तके प्रदान केली.
यंदा आमची सोसायटी 30 व्या वर्षात पर्दापण करीत आहे. शिक्षण योजना 2019 अंतर्गत सोसायटीने या पंचक्रोशीतल्या प्राथमिक शाळा व हायस्कूल पुस्तकांसह कपाट देऊन विद्यार्थ्यांना वाचनांसाठी पुस्तकांची सोय केली आहे. पूस्तके ही कपाटात शोभेची वस्तू म्हणून न ठेवताती मुलांच्या हातात द्या वेळप्रसंगी ती फाटली तरी चालेल. त्या पूस्तकांचा पुरेपुर वापर करावा.
आम्ही भागधारकांचा गरीब व हुषार विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक योजनेअंतर्गत 2 विद्यार्थ्यासाठी त्यांच्या उच्च शिक्षणांसाठी दरवर्षी पंचवीस हजार रु. देणार आहे. ही योजना जून 2021 पासून कार्यान्वित होणार आहे. आमच्या सोसायटीचे कार्यक्षेत्र पूर्ण गोवा आहे असे प्रतिपादन सोसायटीचे चेअरमन ऍड. विनायक नार्वेकर यांनी पेले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदा भगत व आभार अनुजा नाईक हीने मानले या प्रसंगी सोसायटीचे संचालक पुरुषोत्तम फडते, रामानंद तारी, सतीश नाईक, सिताराम गावडे, भानुदास गांवकर, हेमंत नाईक व पालक उपस्थित होते.